माळेगाव यात्रेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा जागर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 25/12/2025 7:04 PM

नांदेड :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा यंदा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरली आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या प्रदर्शनातून यात्रेकरूंमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यात आली.
       यात्रास्थळी ठिकठिकाणी माहितीपर बॅनर लावण्यात आले असून या अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या गीताची ध्वनीफीत वाजवून नागरिकांपर्यंत संदेश पोहोचविण्यात आला. तसेच निवासी मालमत्ता करावर मिळणाऱ्या पन्नास टक्के सवलतीची माहिती यात्रेच्या माध्यमातून प्रभावीपणे देण्यात आली.
         मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघा कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, समन्वयक मधुकर मोरे यांच्या संकल्पनेतून माळेगाव यात्रेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची व्यापक जनजागृती करण्यात आली.
     यासोबतच लावणी महोत्सव व लोककला महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही या अभियानाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यात आला. पुढील टप्प्यात कलावंतांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील विविध गावांमध्येही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची जनजागृती करण्यात येणार आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या