शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/12/2025 6:50 PM

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या ऐन हंगामात खा. प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील अनेकांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढणार आहे. 
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दिनेश निखाते, माजी उपमहापौर आनंद चव्हाण , माजी अब्दुल गफूर ,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे , युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ग्रामीण अतुल पेदेवाडा , NSUI जिल्हाध्यक्ष सुरज शिंदे 
 युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश पाटील कोकाटे , डॉ. विठ्ठल पावडे , काँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष महेश देशमुख, माजी नगरसेवक सुरेश हटकर  ब्लॉक अध्यक्ष प्रभारी संजय वाघमारे, भीमशक्ती शहराध्यक्ष संजय कवठेकर , कार्यालयीन सचिव प्रकाश दिपके, आदींच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सचिव गजानन कल्याणकर , शिवसेना शिंदे गटाचे शहर संघटक दिगंबर कल्याणकर ,रवी कल्याणकर, गोविंद जाधव, आकाश जाधव यांच्यासह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी मधील अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने नांदेडमध्ये काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा वाढते आहे. निवडणुकीच्या हंगामातच काँग्रेसमध्ये सत्ताधारी शिवसेनेतील शहर संघटनासह अनेक तरुण पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आगामी काळात शिवसेनेतील आणि सत्ताधारी पक्षातील अनेक जण काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. दिनेश निखाते आणि व्यक्त केला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या