आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सातारा दि. - सातारा जिल्हा परिषदेचा सन
2020-21,2021-22,2022-23 व 2023-24 या चार वर्षाच े वार्षिक तपासणीच े अहवाल वाचन सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सर्व विभागांचा प्रत्येक खातेप्रमुखांमार्फत आढावा घेतला. त्यांनी खातेप्रमुखांनी क्षेत्रीय भेटी देऊन जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असणाऱ्या विविध विकास कामे, योजना, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, ग्रामपंचायती व अंगणवाडी यांना भेटी देण्याबाबत सूचना त्यांनी यावेळी केल्या. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीमधील अपहार प्रकरणे जलद गतीन े निकाली काढण्याबाबतही सूचना केल्या. सातारा जिल्ह्यातील शाळांतील शिक्षणाची गुणवत्ता वाढण्याच्या अनुषंगाने सर्वानी कामकाज करावे. सातारा जिल्हयातील अंगणवाडयातील कमी वजनाच्या बालकांवर विशेष लक्ष देऊन त्यांचे श्रेणीवर्धन करण्याबाबत विशेष मोहिम राबविण्यात यावी. ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या अनुषंगाने देखील मोहिम हाती घेऊन त्याबाबत दंडात्मक कारवाईच्या करावी. महालेखापाल, स्थानिक निधी लेखा शकाबाबत विशेष शिबीरांच े आयोजन करुन शक पूर्तता करुन जास्तीत लेखा आक्षेप वगळण्याबाबब कार्यवाही करावी. मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानामध्ये सातारा जिल्हयातील जास्तीत जास्त गावामंध्य े चांगले काम करण्याबाबत विभागीय आयुक्त श्री. पुलकुडवार यांनी सूचना
दिल्या.
अहवाल वाचनानंतर सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येत असणाऱ्या नावीनन्यपूर्ण योजनांच े व कामकाजाच े सादरीकरण केले. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत विभागीय आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर आयुक्त (आस्थापना) नितीन माने, अपर आयुक्त (विकास) रवींद्र कणसे, सहाय्यक आयुक्त (तपासणी)विजय धनवटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) निलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) राहुल देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) नागेश ठोंबरे, बांधकाम उत्तरचे कार्यकारी अभियंता मोहसिन मोदी, बांधकाम दक्षिण कार्यकारी अभियंता अमर नलावडे, श्री. गौरव चक्के,, शिक्षणाधिकारी (प्राथ) अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी (माध्य.) धनंजय चोपडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी सुनिल चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार, पशूसंवर्धन उपायुक्त दिनकर बोर्डे, पशूसंवर्धन अधिकारी विनोद पवार, कृषि विकास अधिकारी गजानन ननावरे व सर्व तालुक्याचे गट विकास अधिकारी व सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त कार्यालयातील चंद्रकांत कुलकर्णी, गणेश कस्तुरे, विष्णू कशाळ े उपस्थित होते. अहवाल वाचनानंतर राहुल देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी आभार मानले.
अहवाल वाचनाच े प्रास्ताविक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) निलेश घुले यांनी केले. अहवाल वाचनाची सुरवात सर्व उपस्थित मान्यवरांच े सातारा जिल्हा परिषदेच्यावतीन े स्वागत करुन सुरुवात झाली.