लोकसंवाद साहित्य संमेलनाचे उद्घाटक पदी ना .हेमंत पाटील तर स्वागताध्यक्ष पदी गजानन पांपटवार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/12/2025 5:19 PM

नांदेड : श्री यशवंतराव चव्हाण ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा तालुका उमरीच्या वतीने येत्या 11 जानेवारी रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या 21व्या लोकसंवादक राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ना.  हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली असून संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी गजानन पाम्पटवार यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रविचंद्र हडसनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. 
लोकसंवाद साहित्य संमेलनाचे संयोजक तथा ज्येष्ठ कथाकार दिगंबर कदम यांच्या पुढाकारातून गेल्या वीस वर्षापासून नांदेड जिल्ह्याच्या जिल्ह्यातील नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देत असताना जुन्या साहित्यिकांची पर्वणीही साहित्य चळवळीला गती देण्याचे काम सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात लोकसंवादाचे साहित्य संमेलने आतापर्यंत पार पडले आहेत . आतापर्यंतच्या संमेलनाची अध्यक्ष पद अनेक नामवंत साहित्यिकांनी भूषवलेली आहेत. दरवर्षी या साहित्य संमेलनामध्ये साहित्य चळवळीला गती देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते . यानुषंगाने येत्या 11 जानेवारी रोजी नांदेड शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेले हे 21 वे साहित्य संमेलना असून या संमेलनाचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता ना. हेमंत पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे . याच वेळी संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून गजानन पांपटवार यांची नियुक्ती करण्यात आली असून संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रविचंद्र हडसनकर हे असणार आहेत . साहित्य साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रम असणार आहेत अशी माहिती संयोजक दिगंबर कदम यांनी दिली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या