*केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान
पुसेसावळी,ता.२३
वैद्यकीय मदत,सामाजिक कार्य व जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांना नवी दिल्ली येथील अटल फाऊंडेशन च्या वतीने प्रतिष्ठित ‘अटलश्री' पुरस्काराने सन्मानित करून गौरविण्यात आले.
नवी दिल्ली महाराष्ट्र सदन येथे अटल फाउंडेशनच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय अटल पुरस्कार व अटल श्री पुरस्कार वितरण समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी अपर्णा सिंह,लेखराज माहेश्वरी,रमेश भुत्ड,श्याम जाजू उपस्थित होते.
मंगेश चिवटे अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना उपचार, शस्त्रक्रिया तसेच आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे,कोणताही भेदभाव न करता, निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा हीच आपली ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
पुरस्काराबद्दल श्री.चिवटे यांचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,खा.श्रीकांत शिंदे,केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव,उद्योगमंत्री ना.उदय सामंत,आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर,खा.नरेश म्हस्के यांसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.
प्रतिक्रिया:
'अटलश्री' हा पुरस्कार दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांना समर्पित करीत असुन हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून माझ्यासोबत रुग्णसेवेत झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि प्रत्येक गरजू रुग्णाचा आहे.यापुढील काळातही ना.एकनाथ शिंदे,खा.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवेचे कार्य अखंडितपणे सुरु ठेवणार आहे.