नांदेड :- पूज्य साने गुरुजी जयंती निमित्त जीवन साधना फाउंडेशन च्या वतीने दैनिक वीर शिरोमणीचे संपादक शंकरसिंह ठाकुर यांना पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शंकरसिंह ठाकूर हे पत्रकारिता क्षेत्रातला 15 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव बघता सातत्याने लोकांचा आवाज बनून दैनिक वीर शिरोमणी मधून प्रश्न मांडणे आणि सामान्य गरजु लोकांना काय मदत करता येईल ते पाहत असतात. तसेच ते राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघात राज्य कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असून ते महाराष्ट्र भर संघटनेच्या माध्यमातून अनेक पत्रकार बांधवांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असतात.संपादक शंकरसिंह ठाकुर यांना साने गुरुजी जयंती निमित्त जनभूषण राज्यस्तरीय पुरस्कार दि. 21 डिसेबर 25 घोषित झाला आहे.
पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. त्यांना हा पुरस्कार हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पत्रकारिता सोबतच त्यांचे सामाजिक कार्य खूप मोठ्या प्रमाणात असून ते मातोश्री लक्ष्मी बाई ठाकुर एन.जी. ओ. तर्फ मोठया प्रमाणात जनतेच्या सेवेत आहेत. जीवनसाधना फाउंडेशन ने त्यांच्या साहित्य व समाज उपयोगी कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. त्यांना हा पुरस्कार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी शिवराज्य प्रतिष्ठान निवासी गुरुकुल सारंग स्वामी शाळेच्या बाजूला विवेक नगर येथे जीवन साधना फाउंडेशनचे अध्यक्ष, थोर समाजसेवक श्री सुखानंद कदम व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्राप्त झाला.
हा जनभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.