महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/12/2025 7:46 PM

नांदेड :-  राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम घोषीत झाला असुन या निवडणूकीसाठी प्रत्यक्ष मतदान दि.१५.०१.२०२६ रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने *मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांच्या आदेशाने मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडीयम परिसर येथे दि.२२.१२.२०२५ ते २४.१२.२०२५ या तीन दिवसाच्या काळात पार पडले.

सदरील प्रशिक्षण प्रति दिवस दोन सत्रात पाडण्यात आले असुन यामध्ये प्रामुख्याने मतदान प्रक्रियेतील महत्वाचे टप्पे जसे की, निवडणूक साहित्य स्विकृती व तपासणी, मतदानाच्या आदल्या दिवशीची मतदान केंद्रावरील पूर्वतयारी, प्रत्यक्ष मतदान सुरु होण्यापूर्वीची कामे मतदानास प्रत्यक्ष सुरुवात व मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचारी यांची कामे त्याचप्रमाणे मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्वाच्या प्रकरणी करावयाची कार्यवाही, महत्वाचे अहवाल / नमुण्यातील माहिती भरणे व मतदान साहित्य परत करणे या प्रमुख विषयाची माहिती कर्मचाऱ्याऱ्यांना देण्यात आली.

त्याचप्रमाणे EVM तपासणी, बॅलेट युनिटची तयारी, आदर्श मतदान केंद्राची रचना, प्रदत्त मते, आक्षेपीत / आव्हानीत मतांची कार्यवाही, मतदान प्रतिनिधी नियुक्ती, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ कलम १२५-मतदान गुप्त राखणे, मॉक ड्रील अर्थात चाचणी मतदान, मतदान केंद्रात प्रवेशास पात्र व्यक्ती, मतदान संपविणे, मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी, मतदान प्रक्रियेतील महत्वाची जोडपत्रे या अत्यंत महत्वाच्या विषयांवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणासाठी एकुण ४०४२ कर्मचाऱ्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले होते त्यापैकी ३३४६ कर्मचारी उपस्थित होते तर ६९६ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास दांडी मारल्याचे दिसन आले आहे. निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांविरुध्द *भारतीय दंड संहिता १८८ व लोक प्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ तधील* तरतुदीनुसार नोटीस बजावुन पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सदरील तीन दिवसीय प्रशिक्षणासाठी *कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी रुस्तुम एल. आडे, मुख्याध्यापक बालसाहेब कच्छवे व मुख्याध्यापक साहेबराव शेळके* यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे *अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाचे उपआयुक्त नितीन गाढवे,* सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे तसेच मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षाचे सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादेक, कार्यालय अधिक्षक कल्याण घंटेवाड, धम्मपाल प्रधान व इतर कर्मचाऱ्यांनी सदरील प्रशिक्षणाचे आयोजन यशस्वीरित्या केले.

Share

Other News

ताज्या बातम्या