शहर वाहतूक शाखा इतवारा यांनी अवैध प्रवाशी वाहतूक, विना वाहन परवाना चालणारी वाहने, अवैध अतिक्रमन करणारे फळ गाडे यांचेवरती केल्या 83 केसेस

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/12/2025 3:03 PM

नांदेड :- मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी शहरात वाढत असलेली ट्राफिक समस्या अटोक्यात आणनेसाठी शहरात चालणारी अवैध प्रवाशी वाहतूक तसेच विना परवाना / परमिट चालणारे वाहणे, भरधाव वेगाने चालणारी वाहने, फटाका बुलेट व फळांचे गाडयाचे रस्त्यावरील अतिक्रमण यांचेवरती कार्यवाही करण्याची मोहीम राबविणे बाबत शहर वाहतूक शाखा इतवारा यांना आदेशीत केले होते.

त्या अनुषंगाने दिनांक 23.12.2025 रोजी प्रभारी अधिकारी श्री राजकुमार इंगोले, सहायक पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, इतवारा यांनी स्टाफ अंमलदार यांचे समवेत जुना मोंढा, हबीब टॉकीज, बर्की चौक, सराफा मार्केट, मोहमद अली रोड, देगलुर नाका या ठिकाणी वाहणाची कागदपत्रे तपासणी केली. सोबतच ऑटो चालकांना गणवेश परिधान करणेबाबत सुचना दिल्या. तसेच मोहमद अली रोडवर रस्त्याच्या मधोमध पार्क केलेल्या वाहनांवर कार्यवाही केली व कांही वाहने महानगरपालीका स्टाफचे साहयाने वाहने टोईंग करुन जमा करण्यात आले. वाहतूकीस अडथळा निर्माण होणारे फळांच्या गाड्यांवर, वाहनांवर कार्यवाही करुन एकुन 83 केसेस करण्यात आल्या आहेत.

वाढत असलेल्या ट्राफीक मुळे लोकांनी त्यांची चार चाकी/दोन चाकी वाहने कुठेही पार्क न करता पार्कीगचे ठिकाणी पार्क करावे, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल या प्रकारे कोणतेही फळ गाडे व इतर असे रस्त्यामध्ये लावुन अतिक्रमन करू नये, सिग्नलचे पालन करावे व वाहतुकीस अडथळा होईल अशी कोणतीही कृती करू नये व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा मोटार वाहन कायदा व इतर कायद्यान्वये कडक कार्यवाही करण्यात येईल बाबत पोलीस प्रशासनाचे वतिने आवाहन करण्यात येत आहे.

सदरची कारवाई मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली अधीकारी/अंमलदार शहर वाहतूक शाखा इतवारा, दंगल नियंत्रण पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या