महापालिकेत आदर्श आचारसंहिता अंमबजावणीसाठी कंट्रोल रुमची स्थापना

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/12/2025 7:33 PM

नांदेड :- राज्य निवडणूक अयोगाच्या आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमबजावणीसाठी *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या अधिपत्याखाली पालिका मुख्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

आचारसंहिता व नियंत्रण कक्षामध्ये नागरीकांकरीता आचारसंहिता भंग संदर्भात तक्रारी नोंदविण्याकरीता टोल फ्रि दुरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात येणार असुन सदर कक्षामध्ये प्राप्त होणाऱ्या तोंडी व लेखी तक्रारी संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तात्काळ चौकशी करीता पाठविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सदर तक्रारी संबंधीत कार्यक्षेत्राच्या FST/SST/VST/VVT पथकाकडे तात्काळ चौकशी करीता पाठविणे आवश्यक आहे. तसेच संबंधीत FST/SST/VST/VVT पथकांनी सदर तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ चौकशी करुन तसा अहवाल संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठविणे आवश्यक आहे.

या पथकांच्या माध्यमातुन लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ मधील विविध तरतुदी अन्वये कार्यवाही करण्यात येणार असुन त्यामध्ये प्रामुख्याने मतदारास लाच देणे घेणे, गैरवाजवी दडपण, धर्म, वंश, जात, समाज अथवा भाषेच्या आधारावर व्देष निर्माण करणे, उमेदवाराच्या वैयक्तीक व चारित्र्या बाबत खोट्या बातम्या प्रसिध्द करणे, मतदारासाठी मतदान केंद्रावर जाण्या-येण्यासाठी उमेदवाराने वाहन पुरविणे त्याचप्रमाणे मतदारास धमकी देणे, तोतेयेगिरी, चारित्र्यहनन या सर्व बाबींवर करडी नजर असणार आहे.

या सर्व पार्श्वभुमीवर आचारसंहिता व नियंत्रण कक्षामध्ये नागरीकांनी आचारसंहिता भंग संदर्भात तक्रारी दाखल करण्यासाठी *आचारसंहिता कंट्रोल रुम क्रमांक ०२४६२- २३०७२० व २३०७२१* या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या