शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या पुढाकारातून मरळक येथे विमलेश्वर मंदिरात महाभिषेक ,वृक्षारोपण आणि शासकीय रुग्णालयात अन्नदानही

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/07/2024 7:14 PM

नांदेड:- शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्त सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांचे वतिने मरळक येथील विमलेश्वर मंदिर येथे अभिषेक करुन वृक्षारोपन केले तसेच सुमन बालगृह येथे अन्नदान करण्यात आले. स्वामी समर्थ मंदिरामध्ये महाआरती तर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे रुग्णांना अन्नदान करण्यात आले.
यावेळी सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, ग्रा पं सदस्य तथा कामगार सेनेचे जिहाध्यक्ष बाळासाहेब पावडे, जिल्हा प्रवक्ते बालाजी पेनूरकर, युवा सेनेचे सुनिल पाटील कदम, उप शहर प्रमुख रमेश कोकाटे, उप तालुका प्रमुख नवनाथ जोगदंड, संतोष कदम, निवृत्ती कदम, गंगाधर कदम, नारायण कदम, शिवा कदम, कैलास कदम, संतोष कदम केशव कदम, कैलाश शिवंतवाड, निवृत्ती कदम, विजय वाकडे, रिजवान शेख आदी उपस्थित होते.
राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस याही वर्षी सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला . वाढदिवसानिमित्त मरळक येथील विमलेश्वर मंदिरात सकाळी महाभिषेक करण्यात आला . पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घ आयुष्य मिळो, निरोगी आरोग्य लाभो यासाठी दत्ता कोकाटे यांनी प्रार्थन केली . याचवेळी विमलेश्र्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले . त्यानंतर त्यानंतर रामनगर येथील सुमन बाल गृहातील मुलींना भोजनाची पंगत देण्यात आली. सह संपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या पुढाकारातून सायंकाळी कलामंदिर भागातील स्वामी समर्थ मंदिरात महाआरती करण्यात आली .  सायंकाळी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अन्नदान करण्यात आले.
खा. नागेश पाटील आष्टीकर यांचेही केले अभिष्टचिंतन 
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

Share

Other News

ताज्या बातम्या