अकुज इंग्लीश स्कूल मध्ये स्वच्छंद संगीत सभागृहाचा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/07/2024 9:16 AM

     नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत व प्रशस्त नवीन संगीत सभागृहाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध सतारवादक श्री. शाफत नदाफ  व सुप्रसिद्ध तबलावादक श्री.सुमित जमदाडे उपस्थित होते.
       कार्यक्रमाची प्रस्तावना अकुज इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उपमुख्याध्यापिका  रोझिना फर्नांडिस मॅडम यांनी केली. प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते संगीत  सभागृहाचे उद्घाटन, प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन व संगीत वाद्यांचे पूजन करण्यात आले. अकुज इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
     याप्रसंगी बोलताना न्यू प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक कुंदन जमदाडे सर यांनी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर उपस्थित पालकांनीही आपल्या मनोगतातून या नवीन उपक्रमाला सदिच्छा व शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना विविध कौशल्य आत्मसात करण्यासाठी शाळेमध्ये  सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती अकुज इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कांचन उपाध्ये मॅडम यांनी दिली. 
       अध्यक्षीय भाषणात बोलताना आण्णासाहेब उपाध्ये सर यांनी संगीत विषयाचे महत्त्व व फायदे त्यासाठी कुपवाड नगरीत गेली 40 वर्षे अविरत संस्थेअंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 
    कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाफत नदाफ सर व सुमित जमदाडे सर यांनी सतारवादन व तबलावादन प्रात्यक्षिकांनी श्रोत्यांचे मन मंत्रमुग्ध केले.
      याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुरज उपाध्ये सर, सचिव रितेश शेठ सर, शिरीष चिरमे सर, शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते. 
       कार्यक्रमाचे आयोजन संगीत विभाग प्रमुख विक्रम कदम सर यांनी केले तर निवेदन सुशांत पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे सांगता अकुज प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती. ज्योती पाटील यांच्या आभाराने झाली.

Share

Other News

ताज्या बातम्या