पूरग्रस नागरिकांसाठी जयंत रेस्क्यु टीम तत्पर : शहरजिल्हध्यक्ष संजय बजाज

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/07/2024 10:51 PM

मदत नव्हे हे तर आमचे कर्तव्य..!

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत रेस्क्यू टीमच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगली शहरातील पुरबाधित क्षेत्रातील  शिवशंभो चौक,दत्तनगर,काकानगर तसेच कुपवाड फाटा आदी ठिकाणी पुरबाधित नागरिकांच्या समस्या जाणून घेत सुरक्षित ठिकाणी विस्थापित होण्यास सांगितले.

जयंत रेस्क्यू टीमच्या माध्यमातून सांगली , मिरज व कुपवाड तसेच कृष्णा नदीलगत पुरबाधित ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून लागेल ती मदत करण्यात येईल असे शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेबांच्यावतीने सांगण्यात आले.

महापालिका तसेच पोलीस प्रशासन उत्कृष्ट काम करत आहेच प्रशासनाशी समन्वय ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीला तत्पर असतील.
पुरबाधित नागरिकांना मदतीची गरज भासल्यास सांगली , मिरज व कुपवाड मधील आमच्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास तात्काळ मदत करण्यात येईल.

नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यास घरातून बाहेर पडू नये त्यामुळे प्रशासनास मदत कार्य करताना मर्यादा येतात शिवाय विनाकारण बाहेर पडल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक पोलिसांवर ताण पडतो.
वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा.

नैसर्गिक आपत्तीसारख्या संकटांना आपण सांगलीकरांनी नेहमीच एकजुटीने आणि धीराने सामोरे गेलो आहे.तरी यावेळीदेखील आपण सर्वांनी मिळून हे संकट टाळू.

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी आपल्या सोबत मदतीला खांद्याला खांदा लावून आहोत असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले 


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला सांगली शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे,पक्षाचे सांगली  विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, सांगली शहराध्यक्ष सागर घोडके , मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगे, डॉ छाया जाधव, महालिंग हेगडे, अनिता पांगम,शारदा माळी, प्रियांका विचारे ,संगिता जाधव,वैशाली धुमाळ, फिरोज मुल्ला, संदीप व्हनमाने, सचिन चव्हाण ,प्रकाश सूर्यवंशी, सोमनाथ सुर्यवंशी ,सुरेखा सातपुते, सुरेखा हेगडे,छाया पांढरे,शितल सोनवणे, प्रणवी पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या