भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथे माओवाद्यानी केली इसमाची खबऱ्या म्हणून हत्या

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 26/07/2024 5:17 PM


गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे या इसमाची पोलीस खबरी असल्याच्या कारणावरुन हत्या केली.
        जग्गू आणि त्याची पत्नी 2007 मध्ये नक्षल मध्ये सदस्य म्हणून होते परंतु दोघांनी एकत्रितपणे 2017 मध्ये आत्मसमर्पण केले होते. 
         काल 25 जुलै रोजी ते 26 जुलै चे मध्यरात्री  माओवादयांनी जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे याची आरेवाडा ते हिद्दुर रोडवरील PHC जवळ पोलीस खबरी असल्याच्या कारणावरुन हत्या केली. सदर हत्येप्रकरणी पोस्टे भामरागड येथे गुन्हा दाखल करण्यात येत असुन पुढील कायदेशीर कार्यवाही चालु आहे.तसेच भामरागड परिसरात माओवाद विरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या