पेंढरी ते जिल्हा पोच मार्ग या रोडची झाली दुरवस्था,रोडला आले नाल्यांचे स्वरूप

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 26/07/2024 11:01 AM



प्रतिनिधी गचिरोली पेंढरी: प्रशांत पेदापल्लीवार मो.न ९४०५३५६०७०

 *पेंढरी* 
धानोरा तालुक्यातील पेंढरी  पासून तर जिल्हा पोच मार्ग पर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे अक्षरशः दुर्लक्ष झाल्याने आता पावसाळ्यात त्या खड्डयांना तलावाचे स्वरूप आले आहे. या रस्त्यावर धानोरा तालुका आणी गडचिरोली मुख्यालयात शिक्षण घेण्यासाठी शेकडो विध्यार्थी दररोज ये-जा करतात. विविध कार्यालयात कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या देखील तितकीच आहे. एवढेच नव्हेतर कर्मचारी आणि अधिकारी देखील याच रस्त्याने ये-जा करतात. या सर्वांना याचा जबर फटका बसत आहे.


मागील एक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष झाल्याने परिणामी खड्डयांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. सदर रस्त्यावर दुचाकी चालविणे कठीण झाले असून एसटी बस आणि इतर खाजगी वाहनधारक कसा प्रवास करत असतील याचा विचार न केलेला बरा.


पेंढरी  ते कारवाफा मार्गावर  खड्डयांचा साम्राज्य निर्माण झाल्याने खाजगी वाहनधारक मागील एक वर्षांपासून कारवाफा ते जामडी याच मार्गाचा अवलंब करत आहेत. सध्या पेंढरी  ते कारवाफा रस्त्यावरील  नदीवरील पुलाचे काम अर्ध्यवत असल्याने हाच एक पर्यायी मार्ग वापरण्यात आला. अश्या परिस्थितीत या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या