२८ जुलै रोजी चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 26/07/2024 9:54 AM

नांदेड : येत्या रविवार दि. २८ जुलै २०२४ रोजी नांदेड येथे चर्मकार समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा भव्य कार्यक्रम साईप्रसाद फाऊंडेशनच्या वतीने आरोजित करण्यात आला आहे.
         दत्तनगर नांदेड येथील युवा सामाजिक नेते साईप्रसाद शिवानंद जोगदंड याच्या वाढदिवसा निमित्त रविवार दि. २८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता संत रविदास महाराज मंदिर, शिवनगर, गोविंदनगरच्या बाजूला, नांदेड येथे चर्मकार समाजातील पहिली ते बारावीच्या गरजवंत विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे.
         तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी शालेय साहित्य साईप्रसाद फाऊंडेशनच्या वतीने वाटप करण्यात येणार आहे असेही संयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे. यासाठी 9822754798, 9822662318, 9822556156 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या