महाराष्ट्रातील महापूर व राज्याच्या सर्वर डाऊन बाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/07/2024 3:47 PM

प्रति,
मा.नाम.एकनाथजी शिंदे 
मुख्यमंत्री महारष्ट्र राज्य.

विषय :- सध्या आपल्या महारष्ट्र मधील  महापूर परिस्थिती व राज्याच्या सर्वर डाऊन बाबत

महोदय,

सध्या अखंड महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी महापूर आला आहे काही ठिकाणी येत आहे त्यामुळे सर्वच शैक्षणिक प्रवेश स्पर्धा परीक्षा अन्य शासकीय निमशासकीय परीक्षा याबाबत वेळ कमी पडत आहे काही प्रवेशांची परीक्षांची मुदत ही 29 30 जुलै असेल अथवा ऑगस्ट 15 तारखेपर्यंत अशा स्पर्धा परीक्षा प्रवेश यांची मुदत आहे अशा सर्वांच्यावर प्रचंड मोठ्या पावसामुळे व महापूर सदृश्य परिस्थितीमुळे ह्या सगळ्यांपासून वंचित राहण्याचा धोका आहे 
तसेच सर्व प्रकारचे जातीचे दाखले असतील सध्या नवीन मराठा समाजाला देण्यात आलेल्या (एस ई बी सी) मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि ते मिळाल्यानंतरच जात पडताळणीसाठी आपण अर्ज करू शकतो आपण नुकत्याच काढलेल्या शासकीय जीआर र नुसार जात पडताळणी ची मुदत वाढवलेली आहे मात्र आपल्या राज्याचे सर्वर गेले कित्येक दिवसापासून डाऊन आहे म्हणून त्यांना जातीचे दाखलेच मिळाले नाही मग ते जात पडताळणीसाठी कसे अर्ज करू शकतील हा खरा प्रश्न आहे.
तसेच सर्वर डाऊन असल्यामुळे अन्य लागणाऱ्या एनओसी असतील दाखले असतील त्या सुद्धा वेळेत मिळत नाही या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जात पडताळणीचा ज्या पद्धतीने आपण सहा महिने मुदत वाढ दिलेले आहे.
त्याच पद्धतीने या सर्व दाखले एनओसी प्रवेश स्पर्धा परीक्षा ह्या सर्व बाबींना 20 ऑगस्ट पर्यंत ची मुदतवाढ मिळावी जेणेकरून त्यावेळी पावसाचे प्रमाण कमी असेल सर्वर व्यवस्थित काम करेल व कुणालाही अडचण येणार नाही.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.


Share

Other News

ताज्या बातम्या