संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील व सकल मराठा समाजास विधानसभा लढवण्यास जाहीर आव्हान

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 25/07/2024 11:18 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

संघर्ष योध्दा मा .श्री मनोज दादा जंरागे पाटील साहेब यांना व सकल मराठा समाजास विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी जाहीर आवाहन.  

    मुंबई - दि:रोजी राष्ट्रीय स्वराज्य सेना ( राजकीय पक्ष) दहिसर कार्यालयात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील जिल्हा अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी आले असता सर्वानुमते असे ठरले कि येऊ घातलेली विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन निवडणूक लढवायची .                              
   राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षांत बहुसंख्य मराठे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्याने मराठा समाजाच्या मताचे विभाजन होऊ नये म्हणून संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जंरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुक लढवायची.व या वेळेस आपले धनगर व ईतर समाजाचे हि सहकार्य घेऊन विधानसभा निवडणुकीस सामोरे जायचे.                      राष्ट्रीय स्वराज्य सेना हा election commission of India मध्ये २०१८-१९ ला रजिस्टर असुन विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी आपण ECI ला निवडणूक चिन्हाची हि लेखी मागणी केली असल्याने लवकरच निवडणूक चिन्ह हि भेटेल .मराठा अध्यक्ष म्हणून संघर्ष योध्दा मनोज दादा जंरागे पाटील साहेबाना जाहीर आवाहन करत आहे कि आपण एकत्र पणे कोणाला पाडण्यापेक्षा आपण एकत्र विधानसभा निवडणुक महाराष्ट्रात एकत्र लढवुण मराठा उमेदवार भरघोस मतांनी विजयी करुन विधानसभेत आपलेच २८८ मराठा आमदार पाठवुन आपले हक्काचे मराठा आरक्षण घेउया.

एक मराठा कोटी कोटी मराठा....…….........                          
   एकच मिशन मराठा आरक्षण................
   

Share

Other News

ताज्या बातम्या