जीव गेल्यावर जागी होणार का मनपा, नागरिकांच्या लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांच्याकडे संतप्त प्रतिक्रीया...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/07/2024 11:17 AM

*कत्तलखाना परिसर, डॉक्टर पी आर पाटील मार्ग, लोंढे चौक, नुरानी मस्जिद दोन दिवस झाले मोकाट कुत्र्यांच्या मुळे नागरिक हैराण नागरिकांच्या वर अंगावर जाण्याचे प्रकार वाढले महानगरपालिकेचे आरोग्य विभाग काय करत आहे या परिसरातील नागरिकांच्या संत्रप्त प्रतिक्रिया आमचं जीव गेल्यावर जागे होणार का महानगरपालिका?*
       *लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांच्याकडे केल्या भावना व्यक्त*
 सांगली प्रतिनिधी : सांगलीतील डॉक्टर पी आर पाटील मार्ग, कत्तलखाना  परिसर, नुरानी मस्जिद, लोंढे चौक, रमा माता नगर, शंभर फुटी रोड, कृष्णा हॉस्पिटल परिसर, क्रांती चौक, संगीतकार बाळ पळसुळे मार्ग , या भागात गेले दोन दिवसापासून मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः नागरिकांना हैरण करून सोडले आहे 50 ते 60 कुत्री या भागात वाढले आहेत सरळसर नागरिकांच्या व लहान मुलांच्या अंगावरून धावून जात आहेत या भागात येणाऱ्या नागरिकांना याचा भयानक त्रास होत आहे चारी बाजूंनी कुत्र्यांचा वेळ का निर्माण झाला आहे नागरिकांनी या भागातून कुठून जायचे नागरिकांच्या मागेही मोकाट कुत्री लागत आहेत आता नागरिकांनी काय करायचे? किती वेळा तक्रार द्यायची महानगरपालिकेला डॉग व्हॅन  फिरत नाही यांना नागरिकांची काळजी आहे का नाही या मोकाट कुत्र्यांच्या मुळे या परिसरातील नागरिक अक्षरशा वैतागले आहेत घरातून बाहेर पडायचे का नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे आज सकाळी एकदाच महानगरपालिकेची डॉग व्हॅन आली नुसता फेरफटका मारून गेली डॉग यांनी  फक्त शो बाजी  स्टंटबाजी केली एकाही  कुत्र्याला त्यांनी पकडलेले नाही महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी त्यांना याचे गांभीर्य का नाही एकदा तरी येऊन फेरफटका मारावा म्हणजे त्यांना कळेल या भागात मोकाट कुत्री किती आहेत स्थानिक नागरिकांना या मोकाट कुत्र्यांच्या मुळे सध्या अवघड झाले आहे झुंज झूंड कुत्री रस्त्यावर दबा धरून बसत असतात नागरिक आले की त्यांच्या मागे लागणे, भुंकणे, अंगावर जाणे त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत तरी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेऊन  या भागात दोन दिवस डॉग व्हॅन थांबवून या परिसरातील मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशा आम्ही लोकहित मंच्यावतीने महानगरपालिका आरोग्य विभाग करीत आहे.

 मनोज भिसे - 
अध्यक्ष लोकहित मंच सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या