शक्तीपीठ महामार्ग बाधित सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दि २४ रोजी शेतकरी मेळावा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/04/2024 12:10 PM

   .शक्तिपीठ महामार्ग बाधित सोलापूर जिल्ह्य़ातील बाधित शेतकऱ्यांचा मेळावा पंढरपूर येथे आयोजित करण्याचा निर्णय दि. १६ एप्रिल रोजी   शेळगाव ता. बार्शी जि.सोलापूर येथे पार पडलेल्या प्रमुख शेतकऱ्यांची बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डाॅ. उदय नारकर होते. तर बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी डाॅ.अजित नवले उपस्थित होते. 
बैठकीच्या सुरवातीस ॲड. विनय गायकवाड यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मार्गदर्शन करताना डॉ. अजित नवले महणाले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रकल्प उभा केला असता किंवा रोजगार उपलब्ध होणारा प्रकल्प उभा केला असता तर समजण्यासारखे होते. पण ज्या कारणासाठी जमिनी घ्यायला लागले आहेत ती देवस्थान आगोदरच महामार्गावर आहेत. मग हा अट्टाहास सरकार कशासाठी करत आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर येणारा हा महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आरपारची लढाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज रहावे असे आवाहन त्यांनी उपस्थित 
शेतकऱ्यांना केले. बैठकीत बोलताना काय. उमेश देशमुख यांनी राज्य सरकारने २०१३ च्या जमिन  अधिग्रहण कायद्यात केलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांना योग्व मोबदला मिळु शकत नाही. उलट  शेतकऱ्यांनी जादा रक्कम द्यायला लागु नये याची कायदेशीर तरतुद केली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवणारा हा महामार्ग रद्द करण्याच्या लढाईत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे अवाहन केले. अध्यक्षीय भाषणात डाॅ.नारकर यांनी सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर,  पंढरपूर आणी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा उभा करण्याचे अवाहन त्यांनी केले. यावेळी  ॲड अजय बुरांडे, विजयकुमार पाटील, भड, ॲड देवकर इ. ची भाषणे झाली. यावेळी सतिश साखळकर, प्रभाकर तोडकर, तानाजी सरगर, सुनिल पवार, मुरलीधर नागरगोजे, दत्ता चव्हाण, अतुल फासले इ. सह शेतकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या