भाजपा अनुसुचित जाती मोर्चा सांगलीचा अनुसुचित जाती मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/04/2024 6:02 PM



       रोजी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीने अनुसूचित जाती मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली.  भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारच्या काळात अनुसूचित जातीतील सर्व घटकांसाठी विश्वकर्मा योजना ही समाजाची आर्थिक आणि सामाजिक दिशा घडवणारी योजना आहे असे मत शेखरजी इनामदार यांनी व्यक्त केले. भाजपा लोकसभा समन्वयक माननीय दीपक बाबा शिंदे हे बोलताना म्हणाले भाजप सत्तेत आल्यावर संविधान बदलणार असा अपप्रचार विरोधकांच्या कडून वारंवार होताना दिसत आहे मागचा इतिहास पाहिला तर काँग्रेसच्या साठ वर्षाच्या कालावधीत असंख्य वेळा संविधानात वेगवेगळे बदल हे काँग्रेस सरकारने केले होते तसेच जाती जातीचे राजकारण करण्याची परंपरा ही काँग्रेसने कायम ठेवली होती भाजपा ही तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आज समाजातील सर्व घटकांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या वतीने केला जात आहे इथून पुढच्या कालावधीत ही सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कार्यरत राहील. रिपाई गटाचे नेते प्रदेश सरचिटणीस जगन्नाथ दादा ठोकळे असे म्हणाले भाजप युतीतील घटक पक्ष हे सर्व पक्ष समविचारी आहेत त्यामुळे जातीभेद न करता भाजप सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा राष्ट्रीय पक्ष आहे इथून पुढील काळात ही शहरातील विविध दलित वस्त्यांमध्ये विकासाचे धोरण राबविण्यात येईल. यावेळी उपस्थित भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष  पैलवान पृथ्वीराज भैय्या  पवार. अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे. अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस. संदीप तात्या ठोंबरे. जिल्हा उपाध्यक्ष पैलवान विशाल पवार. प्रदेश सचिव रूपालीताई देसाई. माजी नगरसेवक सुबराव तात्या  मद्रासी . जिल्हा उपाध्यक्ष माधुरीताई वसगडेकर. जिल्हा सचिव प्रीती ताई काळे. अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे. शहर जिल्हा दादासाहेब कांबळे. एडवोकेट  आघाडीच्या काजल कांबळे. नाना कांबळे .संदीप कुकडे. अर्जुन मजले. प्रियानंद कांबळे.  युवा नेते कुणाल संकपाळ. रवींद्र वादवणे. अभिमन्यू नाना भोसले. विकास ऐवळे. राजू दादा मद्रासी. तसेच अनुसूचित जाती धर्मातील असंख्य तरुण-तरुणी  बंधू भगिनी  मोठ्या संख्येने मेळाव्यात उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या