नागरिक जागृती मंचच्या सततच्या प्रयत्नाने सांगली रेल्वे स्टेशन हरीद्वार, ऋषीकेश व प्रयागराज व मुजफरपूरसह ४ रेल्वे गाड्यांना थांबा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/04/2024 7:25 PM

सांगली जिल्हा नागरी जागृती मंचच्या सततच्या प्रयत्नांमुळे सांगली रेल्वे स्टेशनवर हरिद्वार ऋषिकेश व प्रयागराज मुजफ्फरपुर जाणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे 4 गाड्यांना थांबा मिळाला.

गाडी 06225/06226 हुबळी-हरिद्वार-ऋषिकेश एक्सप्रेस व ऋषिकेश हरिद्वार हुबळी एक्सप्रेस तसेच गाडी 07315/07316 हुबळी-प्रयागराज-मुजफ्फरपुर एक्सप्रेस व मुजफ्फरपुर-प्रयागराज-हुबळी एक्सप्रेस या 4 गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातील प्रवाशांनी भरपूर संख्येने सांगली रेल्वे स्टेशन ते हरिद्वार, ऋषिकेश व सांगली रेल्वे स्टेशन ते जबलपूर प्रयागराज मुजफ्फरपुर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे तिकीट काढावे व सांगली रेल्वे स्टेशन वरून या गाड्या पकडाव्या.

विशेष म्हणजे हरिद्वार ऋषिकेश ला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना सांगली जिल्ह्यातून भरपूर लोक जाणारे असल्यामुळे हुबळी-हरिद्वार-ऋषिकेश एक्सप्रेस गाडीला सांगली रेल्वे स्टेशनवर 10 मिनिटांचा थांबा देण्यात आलेला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या