*तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 29/04/2024 5:27 PM

*तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन*

चंद्रपूर दि. 29 : जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSONS या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र  व ओळखपत्र उपलब्ध करुन द्यावयाचे असल्याने तृतीयपंथीयांची  कागदपत्रासह माहिती आवश्यक आहे. त्याकरीता तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे किंवा  संघटना येथील प्रतिनिधीनी किंवा स्वत: तृतीयपंथी या व्यक्तींने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन तृतीयपंथी असलेबाबतची वैयक्तिक व  रहिवाशी पुराव्याबाबतची माहिती त्वरित सादर करावी. जेणेकरून अपले माहितीचे आधारे NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSONS या पोर्टलवर माहिती भरुन तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळाखपत्र देण्यात येईल, असे सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी कळविले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या