आरोप प्रत्यारोप नकोत, प्रश्न सोडवा, " सांगलीच्या प्रश्नावर बोलू काही " चर्चासत्रातील सूर...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/04/2024 11:57 AM

*** विमानतळ, ड्राय पोर्ट, उद्योगावर झाली चर्चा

सांगली :
खासदार हे अठरा लाख लोकांचे प्रतिनिधी म्हणून आपण संसदेत पाठवतो, मात्र ते केवळ परस्परांवर आरोप प्रत्यारोप करतात, याचा कोणालाच उपयोग नाही. त्यामुळे उमेदवारांनी प्रश्नांवर बोलावे, प्रश्न सोडवा असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला. 

सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभामीवर नागरिक जागृती मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांगलीच्या प्रश्नावर बोलू काही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सतीश साखळकर, वि.द.बर्वे, तानाजी रुईकर यांनी हे आयोजन केले होते.
सांगलीच्या प्रश्नांवर बोलू काही या कार्यक्रमात नागरिक आणि ग्रामस्थ यांच्याकडून विविध प्रश्न पाठवण्यात आले होते. यामध्ये ड्रायपोर्ट, विमानतळ, कारखानदारी, अमली पदार्थ, उद्योगधंदे, शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र, टेंभू योजना  विविध प्रशांवर चर्चा झाली.
यावेळी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावतीने संतोष पाटील उपस्थित होते, तसेच अनिल कवठेकर , प्रशांत भोसले, ऍड.ठाणेकर, नितीन चव्हाण, आनंद देसाई, शशीकांत नागे, दिलीप भोसले, सचिन मोहिते, ललितकुमार दबडे, पितांबर शेटे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या