मिरज जंक्शन मधून हरिद्वार व ऋषीकेश साठी थेट रेल्वे सेवा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/04/2024 10:50 PM

      दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी  विभागाकडून हुबळी ते हरिद्वार ऋषिकेश साठी समर स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 06225 ऋषिकेश ग्रीष्मकालीन विशेष गाडी हुबळी येथून सोमवार दिनांक 29 एप्रिल 06 मे 13 मे, 20 मे, व 27 मे रोजी निघणार आहेत ही गाडी मिरज स्थानकावर मध्यरात्री 03:15 वाजता येऊन 03:20 मिनिटांनी सुटेल परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक  06226 योग नगरी ऋषिकेश हुबळी ग्रीष्मकालीन विशेष गुरुवार दिनांक 2 मे, 9 मे, 16 मे, 23 मे, व 30 मे रोज रोजी संध्याकाळी 05 वाजून 55 मिनिटांनी निघून तिसऱ्या दिवशी दुपारी 12:15 वाजता मिरज येथे पोहोचणार आहे. या गाडीस हुबळी नंतर धारवाड, बेळगाव, घटप्रभा, मिरज, सातारा, पुणे, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, भोपाळ, बिना, झाँशी, मथुरा, हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद, मेरठसिटी, खतैली, मुजफ्फरनगर, देवबंद, टपरी जंक्शन, रूडकी आणि हरिद्वार या ठिकाणी थांबे देण्यात आलेले आहेत. तरी कृपया प्रवाशांना अहवान करण्यात येत आहे की अश्या प्रकारच्या विविध समर स्पेशल गाडीची नोंद करून प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा असे  मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य *किशोर भोरावत* यांनी केले आहे. तसेच हुबळी विभागाकडून हुबळी हरिद्वार, हुबळी मुजफ्फरपुर, हुबळी जोधपुर, हुबळी भोपाळ अशा विविध समर स्पेशल गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत तरी या गाडीचा सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी व प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान रेल्वे प्रवासी सेना चे कार्याध्यक्ष *संदीप शिंदे* व उपाध्यक्ष *राजेंद्र पाटील* यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या