औध्योगिक वसाहती मधील चालू असलेल्या रस्त्याला थर्मोलस्टीकये पटटे, झेब्रा क्रॉसिंग, रबरिंग स्ट्रेप टाकण्या बाबत चेंबरचे एमआयडीसी कार्यकारी अभियंता यांना निवेदन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/04/2024 3:47 PM

कुपवाड : प्रतिनिधी 

सध्या कुपवाड औद्योगिक क्षेत्रामधील रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून सदरचे काम जवळजवळ पूर्ण होत आलेले आहे. सदर रस्त्याचे काम स्वत एम.आय.डी.सी. ऑफिस चे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक वेळोवेळी हजर राहून रस्ता उत्कृष्ट करून घेण्यास त्यांचा मोलाचा वाटा आहे असे मत कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी मांडले.

एम.आय.डी.सी. ऑफिस ला दिलेल्या निवेदनात असे म्हणले आहे की, रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाले असून या रस्त्यावरुन ये-जा करणारी वाहने जलदगतीने चालवली जात आहेत. वाहनाचा वेग लक्षात घेता  कधीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आपण या रस्त्यावर थर्मोप्लास्टीकचे पट्टे मारणे व झेब्रा क्रॉसिंग करणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे वाहनांच्या वेगमर्यादेवर नियंत्रण येण्यासाठी थर्मोप्लास्टीकचे रबरिंग स्ट्रीप टाकणे आवश्यक आहे.

तरी लवकरात लवकर एम.आय.डी.सी.  यांनी यामध्ये लक्ष घालून अपघात होऊन धोका टळणेसाठी रस्त्यावर थर्मोप्लास्टी पट्टे मारणे, झेब्रा कॉसिंग करणे आणि थर्मोप्लास्टीकचे रबरिंग स्ट्रीप टाकणेत यावे अशी मागणी कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे सचिव गुंडू एरंडोले सर्व संचालकांनी निवेदनाद्वारे केली.

Share

Other News

ताज्या बातम्या