विशाल पाटील यांना मिरज सुधार समितीचा जाहीर पाठिंबा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/04/2024 11:54 AM


■ मिरज जंक्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी घेतला शब्द
________________________________________ 

सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मिरज सुधार समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. मिरज रेल्वे जंक्शन विकास, रखडलेले छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि मिरज औद्योगिक वसाहतीतील बंद पडत असलेले उद्योगाबाबत ठोस भूमिका घेण्याचे आश्वासन विशाल पाटील यांनी मिरज सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी जेष्ठ नेते सुरेशबापू आवटी, माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, अशोकसिंग रजपूत, ऍड. इर्शाद पालेगार उपस्थित होते.

मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, कार्यवाह जहीर मुजावर, उपाध्यक्ष नरेश सातपुते, राकेश तामगावे, हाजी शाहिद पीरजादे, रामलिंग गुगरी, अभिजीत दानेकर, वसीम सय्यद, रवी बनसोडे, संतोष मुळे, अहमद ढालाइत, सलीम खतीब, संतोष जेडगे, जावेद शरीकमसलत, मन्सूर शेख आदी पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची भेट घेतली. केंद्राशी निगडित असलेल्या मिरज रेल्वे जंक्शन विकास, रखडलेले बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता तसेच डबघाईस आलेले मिरज औद्योगिक वसाहतबाबत विद्यमान खासदार गांधाराची भूमिका घेत आहेत. त्यांनी दहा वर्षात केवळ पाठीवर हात ठेवून गोड बोलून मिरजेसह जिल्ह्याचा विकासच गोल केल्याची टीका मिरज सुधार समितीने केली. विशाल पाटील हे उच्च शिक्षित आणि अभ्यासू असल्याने लोकसभेत प्रश्न मांडण्याची धमक त्यांच्यात असल्याने मिरज सुधार समिती सक्रिय पाठींबा देत असल्याचे ऍड. ए. ए. काझी यांनी सांगितले

Share

Other News

ताज्या बातम्या