माढा आणि सातारा दोन्हीही उमेदवार एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येथील : शरद पवार

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 29/04/2024 6:12 PM

 


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)


दहिवडी :माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील आणि साताऱ्यातून शशिकांत शिंदे दोन्हीही उमेदवार कर्तबगार आणि अन्यायाच्या विरोधात चिडून उठणारे आणि जनतेच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे असणारे दोन्हीही उमेदवार एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील असे प्रतिपादन शरदचंद्रजी पवार यांनी दहिवडी येथील माढा लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये केले

यावेळी उपस्थित 
विजयसिंह मोहिते पाटील,उत्तम जानकर, सुरेंद्र गूडगे, नंदकुमार मोरे,अमित देसाई,डॉ.महेश माने,रणजित देशमुख, विश्वंभर बाबर, पिंटू मांडवे,महेश जाधव,इत्यादी उपस्थित होते 

पुढे बोलताना शरदचंद्रजी पवार म्हणाले की.माढा व सातारा  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार विकासासाठी रक्ताचे पाणी करणारे आहेत. माढा आणि साताऱ्याच्या जनतेला आव्हान आहे की देशाची लोकशाही वाचविण्यासाठी मोदी आणि शहा यांची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी, संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना घरी बसविण्यासाठी, महागाई वाढवून गोरगरिबांचे कंबरडे मोडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा असे आवाहन शरदचंद्रजी पवार यांनी केले.

जयंत पाटील बोलताना म्हणाले की अभय जगताप यांचे आभार मानतो उमेदवारी मिळाली नाही तरीदेखील निष्ठा सोडली त्यामुळे माण खटावमधून मताधिक्य मिळणार यात शंका नाही. भाजपाचे नेते बाबासाहेबांनी लिहलेले संविधान बदलण्याची भाषा करतायेत.गॅरंटीने सांगतो ३२ते ३५ खासदार आमचे असतील. आणि माण खटावच्या जनतेला विनंती आहे जसा तुम्ही खासदार द्यायचा निर्धार केलाय तसा येथील आमदार देखील आम्हाला पाहिजे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, खासदार झाले तर माण खटावचा आमदारही शरद पवार साहेबांच्या विचाराचा असे प्रतिपादन त्यांनी केले.

माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले की प्रथमता अभयसिंह जगताप यांचे आभार मानतो तेही माढ्यातून इच्छुक होते आणि पवार साहेब आणि माझ्या शब्दाला मान देऊन आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि त्यांच्या माध्यमातून चांगले मताधिक्य मिळेल अशी अशा व्यक्त केली.माणच्या आमदाराने पोलीस आणि तहसीलदार हाताशी धरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायचे असले प्रकार यापुढे मी चालू देणार नाही. इथून पुढे माण खटावमधील कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर एक फोन करा मी एका तासात तिथे येतो. आतापर्यंत भाजपाने शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर,पोलीस, शासकीय कर्मचारी सर्वावरती अन्याय केलाय तो आपल्या थांबवायचा आहे.म्हणून पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली आहे. येत्या ७ मे ला माझ्या पाठीशी उभा रहा मी तुमची सेवा करायला कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली 

प्रभाकर देशमुख बोलताना म्हणाले की कृषीमंत्री असताना शरद पवार साहेबांच्या माध्यमातून माण-खटावला दोनशे कोटी रुपये निधी पाणलोट विकास क्षेत्रासाठी देण्यात आला. आंधळी धरणात आलेले पाणी जनतेला द्यायची इच्छा नाही जनता पाण्यासाठी टाहो फोडतेय. धारणातील पाणी भाषपीभवन होऊन निघून जातेय. म्हणून माणच्या लबाड प्रतिनिधींना खासदारासोबत घरी बसवण्याचे काम ही जनता करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मनोवाद्यांच्या तावडीतून देश सोडविण्यासाठी आणि सुरु असलेली हुकूमशाही बंद करण्यासाठी माढ्यातून कमळ कायमचे खुडण्यासाठी माण खटावमधून धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रचंड मताधिक्य देणार असे प्रतिपादन अभयसिंह जगताप यांनी केले.


दहिवडी येथे माढा लोकसभा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना शरदचंद्रजी पवार वइतर 


Share

Other News

ताज्या बातम्या