गांजा तस्करांना पकडून परस्पर तडजोड करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/04/2024 10:27 AM

प्रति,
मा. पोलीस अधीक्षक सो, 
सांगली जिल्हा पोलीस.

विषय : गांजा तस्करांना पकडून परस्पर तडजोड करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याबाबत...

महोदय,

मिरज शहरात गांजासह अन्य अंमली पदार्थांची तस्करी वाढत आहे. त्यामुळे शहरात व्यसणींची संख्या वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शहरात ही परिस्थिती असताना काही लाचखोर पोलीस कर्मचारी गांजा तस्करांना पकडुन त्यांच्यावर कारवाई न करता परस्पर तडजोड करून सोडून देत असेल तर हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. काही पोलिसांची अशी प्रवृत्ती असेल तर मिरज शहरात गांजासह अन्य व्यसणींची संख्या का वाढणार नाही...? असा प्रश्न सर्वसामान्य मिरजकरांना पडला आहे. म्हणून मा. पोलीस अधीक्षक गुगे साहेबांनी या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, विनंती. 
सोबत 
दि. 16/04/2024 रोजीच्या दैनिक लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण जोडले आहे.

आपली,
मिरज सुधार समिती

Share

Other News

ताज्या बातम्या