नरवणे येथील शिवारात डोंगराकडे ला फुलवली आंब्याची व सफरचंदाची बाग

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 16/04/2024 4:27 PM

 



नोकरीतुन  सेवानिवृत्त झाल्यावर केली सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी 

आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मौजे नरवणे येथील चंद्रकांत बागल यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले आहेत. डोंगराच्या कडेला आंब्याची लागवड देखील केली आहे. बागल  यांनी 38 वर्ष पोलीस दलात  सेवा करून पोलीस दलातून सेवानिवृत्त झाल्यावर  शेतीत राबण्याचा निश्चय केला.

शेतीमध्ये सुरुवातीपासूनच नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांना जिल्हा परिषदेची आणि कृषी विभागाची देखील मोलाची साथ मिळाली. ठिबकला त्यांना अनुदान मिळाले. या विविध बाबींसाठी मिळालेल्या अनुदानामुळे त्यांना शेती व्यवसायात मदत झाली.

बागल  यांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला त्यांनी आंब्याच्या  लागवडीचा प्रयोग केला. सिडलिंग राफ्टिंग या तंत्रज्ञानाने सफरचंद लागवड करण्यात आली. लागवड केल्यानंतर साधारणतः तीन वर्षांनी यातून त्यांना उत्पादन मिळाले. अडीच एकरात  दोन टन  अर्थातच 20 क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले.

आंब्याचे 150 रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे . त्यातून त्यांना जवळपास तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या या लागवडीतून लाखोंची कमाई झाल्याने त्यांनी  आंब्याची व सफरचंदाची लागवडीचे क्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला. यानुसार त्यांनी 1 गुंठे जमिनीत सफरचंद बाग फुलवली.

यंदाच्या वर्षी त्यांनी लागवड केलेल्या सर्वच्या सर्व म्हणजेच 1500 झाडांना फळ धारणा  झाली आहे 

यामुळे उत्पादनात वाढ होणार असून कमाई मध्ये देखील मोठी वाढ होण्याची त्यांना आशा आहे.निश्चितच दुष्काळी पट्ट्यात केलेला हा प्रयोग इतरांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे यात शंकाच नाही.

Share

Other News

ताज्या बातम्या