मनपा क्षेत्रात चालू असलेल्या ५५ कोटीच्या रस्ते कामातील टक्केवारी सह निकृष्ट कामाची चौकशी करण्याची लोकहित मंचची मागणी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/04/2024 6:45 PM

मा.शुभम गुप्ता,
आयुक्त तथा प्रशासक,
 सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका .
विषय : महापालिका क्षेत्रातील 55 कोटींच्या रस्ते कामातील टक्केवारी सह निकृष्ट कामाची चौकशी करण्याबाबत
महोदय,
             सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांच्या कामांना वेग आला असून या कामांसाठी सुमारे 55 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात असतानाही ही होणारी कामे ठेकेदारांकडून अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जात आहेत .वापरले जाणारे मटेरियल हे कमी दर्जाचे वापरले जात आहे .मुरमा ऐवजी मातीचाच वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे .शहरातील महत्त्वाचा असणाऱ्या छत्रपती शाहू मार्गावरील केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणूक योजनेतून 15 कोटी 17 लाख रुपये खर्च करून संबंधित ठेकेदारांना अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता केलाय .सदर रस्त्याला लेवल करण्यात आलेली नाही रस्त्याकडेच अतिक्रमण काढणं गरजेचे असतानाही अतिक्रमणे तशीच ठेवून केवळ 60 फूटच रस्ता करण्यात आलाय मातीचा वापर मोठ्या प्रमाणावर झालाय .कडेची झाड विद्युत खांब काढण्याची आवश्यकता असतानाही तसे करण्यात आले नसल्याने ,आम्ही लोकहित मंचच्या  वतीने अनेक वेळा याविरुद्ध आवाज उठवून प्रशासनाकडे निवेदनांच्या माध्यमातून कारवाईची मागणी करूनही याबाबत कोणताही ठोस निर्णय अथवा संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही .
        काहीच दिवसांपूर्वी रस्त्याचं काम सुरू असताना छत्रपती शाहू महाराज मार्गाला डी मार्ट समोर भलं मोठं भगदाड पडल्याची घटना घडली होती हे भगदाड म्हणजे निकृष्ट कामाचा प्रत्ययच होता .
             या कामातील निधीमधील टक्केवारी मोठी असून ठेकेदारांकडून संबंधित नेते आणि अधिकाऱ्यांना टक्केवारी दिली जाते.या टक्केवारीच्या रकमेमुळे ठेकेदाराकडून कमी दर्जाचे मटेरियल वापरून कामे केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे .आपण नव्या रक्ताचे, तरुण, तडफदार आयुक्त आहात आपण याबाबतीत जाणीवपूर्वक लक्ष घालून चौकशी कराल ही आम्हाला अपेक्षा आहे .या झालेल्या रस्ते कामांच्या दर्जाची तपासणी करावी तसेच सदर कामे पूर्ण झाली नसतानाही बांधकाम विभागाने काही ठेकेदारांना काम पूर्ण झाल्याचे दाखले दिले आहेत याचीही चौकशी झाल्यास मोठा आर्थिक घोटाळा समोर येऊ शकतो .आपण तीही चौकशी लावाल ही अपेक्षा यावेळी लोकहित मंच सचिव आदित्य  ऐवळे उपस्थित होते 

कळावे                                
 मनोज भिसे
  (अध्यक्ष,लोकहित मंच)

Share

Other News

ताज्या बातम्या