निवडणुकीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 15/04/2024 4:57 PM


गडचिरोली दि. 15 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय, शांततापूर्ण आणि पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सूक्ष्म निरीक्षकांचे (मायक्रो ऑब्झर्व्हर) प्रशिक्षण आज पार पडले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या प्रशिक्षणाला निवडणूक निरीक्षक राहुल कुमार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, नोडल अधिकारी प्रशांत शिर्के आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणात मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी त्यामध्ये येणाऱ्या अडी-अडचणींचे निराकरण, मॉकपोल पध्दती, सूक्ष्म निरीक्षक आणि इतर अधिकारी यांच्यातील समन्वय, मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य आदि बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.
मतमोजणी केंद्राची मांडणी व नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, सूक्ष्म निरीक्षकांचे कार्य, संनियंत्रण पद्धती, अडचणी आल्यास करावयाच्या उपाययोजना अशा अनेक विषयांवर संगणकीय सादरीकरणाद्वारे निवडणूक निरीक्षक राहुल कुमार यांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात केले.
प्रशिक्षणास निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000

Share

Other News

ताज्या बातम्या