यल्गार सांगलीच्या स्वाभिमानाचा, हुकार सांगलीच्या जनतेचा...!!!

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/04/2024 8:18 PM

तू लढ विशाल. .आम्ही हाय सोबत 

तळागाळात फिरताना कोपऱ्यावर असो किंवा चौकात किंवा स्टॅण्डवर किंवा जिल्ह्यात कुठं पण 
मग कळतं सवरत झालेलं पोर असो किंवा देशधुरा सांभाळणारा युवक असो नाहीतर मार्गदर्शनाच्या भूमिकेत असलेली ही जुनी जाणती आमची ज्येष्ठ माणसं असो 
सगळीकडं एकच चर्चा हाय. .विशाल पाटलालाच तिकीट द्याय पाहिजे हुतं पण आता तिकीट असो नाहीतर नसो यंदा बंद दरवाजा फोडायचाच. .ही बंडखोरी असली तरी सांगली जिल्ह्यासाठी विशाल पाटलानं ती करायलाच पाहिजे, निवडून आपण आणू.

म्हणून म्हणतोय जिल्हा सारा. ..

तू लढ विशाल. ... आम्ही हाय सोबत.

तर मग सांगलीकरानो या आपल्या विशालदादाच्या समर्थनार्थ आणि त्याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवार दि.16 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता सांगलीच्या गणपती मंदिरासमोर पदयात्रेसाठी झाडून यायला लागतंय. .एकटं नाही सगळ्यांनी मिळून यायला लागतंय आणि हा इतिहास घडवावा लागतोय कारण ही सांगली आहे. डावलायला नव्हत पाहिजे आणि आता हे असं डावललंय तर मग आम्ही आमच्या सांगलीसाठी हा इतिहास घडवणार. ..आता बदल ह्यो हुणारच आणि आपल्या विशालला आपण खासदार करणारच .. करायचंच. ..सांगलीसाठी आपल्या स्वाभिमानीसाठी 

मी जातोय सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्ही पण यालंच. ..सुट्टी नॉट 
   
•   दिनांक: 16 एप्रिल 2024 
    वेळ:सकाळी 9:30 वाजता.
• ठिकाण: श्री गणपती मंदिर, सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या