डायरेक्टर जनरल ऑफ फायर सर्विस अवार्ड मनपा अग्निशमन अधिकारी, कर्मचारी यांना जाहीर...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/04/2024 2:55 PM

राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह  निमित्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील माळी, वाहन चालक श्री राजेंद्र कदम व बाबुराव कोळी यांना चांगले सेवेबद्दल भारत सरकार केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने डायरेक्टर जनरल ऑफ फायर सर्व्हिसेस अवार्ड नुकताच जाहीर झालेला आहे. 
त्याबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक  शुभम गुप्ता व अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, चंद्रकांत खोसे उपायुक्त वैभव साबळे, शिल्पा दरेकर यांनी  अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा  दिल्या आहेत.
मनपा सेवेत कार्यरत असलेले श्री सुनील माळी यांची आज अखेर  १९ वर्षे इतकी सेवा झाली आहे, सध्या प्रभारी अग्निशमन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, 
श्री कदम आणि कोळी यांनी देखील अनुक्रमे  ३५ व ३० वर्षे   इतकी सेवा केली आहे .


Share

Other News

ताज्या बातम्या