नवीन शैक्षणीक धोरण हे विद्यार्थ्यांना नवीन दिशा देणारे - मा. चंद्रकांतदादा पाटील.

  • Y.D.Dhake (Bhusawal)
  • Upadted: 10/02/2024 8:12 PM


जळगाव
धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिनिस्त असलेल्या शैक्षणीक संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांची 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०'या विषयावर सहविचार सभा शुक्रवार दि.९ रोजी सायंकाळी संपन्न झाली.

व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, अतिथी कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी, नवीन शिक्षण धोरण समिती सुकाणू समितीचे सदस्य अनिल राव, धनाजी नाना चौधरी महाविद्यालय संस्था सचिव डॉ. पी. आर. चौधरी उपस्थित होते. 

मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वल झाले. प्रास्ताविकात आमदार शिरीषदादा चौधरी यांनी  आदरणीय चंद्रकांत दादांच्या जळगाव दौऱ्यात आमच्या संस्थेला त्यांनी कार्यक्रम घेण्याची संधी दिली ही आमच्या संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज आहे ज्या अडचणी येत आहेत. त्या कशा दूर करता येतील याचा विचार झाला पाहिजे. उदाहरणार्थ महाविद्यालयांसाठी लागणारे शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी वेतनातर अनुदान कायम विनाअनुदानित धोरण बदलवून अनुदानित धोरण होणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण समाज विकासाची साधन असल्याने त्याकडे दुर्लक्ष न करता शिक्षण संस्था कशा सक्षम आणि बळकट होतील या विषयी कौशल्य आधारित विद्यार्थी घडवण्यासाठी महाविद्यालयात लागणाऱ्या सुविधा कशा देता येतील याचा विचार शासन स्तरावर होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालय चालवित असताना महाविद्यालयाच्या प्राचार्यां समोरील येणारे विविध प्रश्न या बाबत देखील विचार होणे गरजेचे आहे. चंद्रकांतदादा आपण या सर्व प्रश्नांकडे निश्चित लक्ष केंद्रित करून ते सोडवण्याचा प्रयत्न करा याचा मला सार्थ विश्वास आहे. असे प्रतिपादन केले.

सुकाणू समितीचे सदस्य मा.अनिल राव यांनी नवीन शैक्षणीक धोरणा विषयी संस्थाचालकांनी माहिती देत शैक्षणीक संस्थाचालक यांच्याकडून मंत्री पाटील यांना नवीन शैक्षणीक धोरण व महाविद्यालय व शैक्षणीक संस्थापुढील अडचणी मांडल्या. 

विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टीकल नॉलेजवर भर नवीन शैक्षणीक धोरण हे विद्यार्थ्यांना नवीन दिशा देणारे असणार आहे, यात विद्यार्थ्यांना घोकम पट्टी नसून यात त्यांना प्रॅक्टीकल नॉलेजवर जास्त भर दिला जाणार आहे. या साठी महाविद्यालय परिसरातील विविध कंपन्या, शासकीय व निमशासकीय कार्यालय, बँक आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना इन्टंरनीशप करण्याची संधी मिळणार आहे. या साठी त्यांना मानधन देखील दिले जाण्याचे प्रयोजन करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे शैक्षणीक संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांची इंन्टरनशीप करावी या बाबत शंका बाळगु नये अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शैक्षणीक संस्था अध्यक्ष व सचिव यांच्या सहविचार सभेत त्यांनी दिल्या.

सभेत उपस्थित आमंत्रित पाहुणे तथा संस्था अध्यक्ष व सचिव प्रतिनिधी यांचे आभार संस्थेची सचिव डॉ. पी. आर. चौधरी यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कल्पना भारंबे आणि डॉ. नितीन बडगुजर यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या