मनपाध्या आरोग्य विभागामध्ये एन कॅप निधीत घोटाळा ? , चौकशीची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/10/2023 5:26 PM

प्रति,
मा.आयुक्त ,
     सा.मि. कू महानगरपालिका 

विषय :- सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आरोग्य विभाग मधील राज्य व केंद्र सरकारचा एन कॅप मधील निधीच्या  घोटाळ्याबाबत...

महोदय ,


आपल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आरोग्य विभाग मधील केंद्र व राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या एन कॅप निधी मधील जे कामे प्रस्थवित करण्यात आली आहेत त्या मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झालेले आहेत
कुटल्या कामा साठी सदर हेड मधील तरतूद घालताना टक्केवारी दिल्या शिवाय तरतूद घालण्यात येत नाही तसेच सदर कामे दहा लाखांच्या आतील तुकडे करून अंदाज पत्र तयार करण्यात आली आहेत
तसेच सदर कामाच्या निविदा ठराविक काँट्रॅक्टर लाच मिळावी अश्या पद्धतीने ऑनलाइन निविदा मॅनेज करण्यात आल्या आहेत प्रभाग समिती १,२,३,४ मनपा बांधकाम विभाग मुख्यालय,आरोग्य विभाग 
तसे सदर हेड मधील सर्व कामाच्या निविदा प्रक्रिया रद्द करण्यात याव्यात तसेच सदर सुचवण्यात आलेली कामे योग्य ठिकाणी सुचवली आहेत अथवा नाही ह्याची चौकशी करण्यात यावी
सदर सर्व कामांची नव्याने टेंडर प्रक्रिया राबवण्यात यावी व ती महा ई टेंडर वर प्रसिद्ध करण्यात यावीत 
आणि ह्या प्रक्रिये मध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या