◼️लखीमपूर शेतकरी हत्याकांडाचा काळा दिवस..*
◼️मोदी सरकार विरुध्द वणी येथे किसान सभेचे निदर्शने...*
◼️शेतकरी हत्याकांडाचे आरोपी केंद्रीयमंत्रीचे मुलाला कडक शिक्षा देऊन पीडितांना न्याय देण्याची मागणी...*
वणी : भाजपच्या मोदी सरकार कडून भांडवलधार्जिणे काळे तीन कृषी कायद्याला विरोध करीत असलेल्या शेतकऱ्यांवर भाजपचये मोदी सरकार मध्ये असलेल्या केंद्रीयमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या मुलगा आशिष मिश्रा व त्याचे साथीदारांनी कट रचून अक्षरशः शेतकऱ्यांचा अंगावर वाहन चालवून चार शेतकऱ्यांचा व एक पत्रकाराचा जीव घेतला तसेच अनेक शेतकऱ्यांना गंभीर जखमी केले. ह्या घटनेला दोन वर्षपूर्ण होऊनही अजूनही पीडितांना न्याय मिळाला नाही. ह्याचा निषेध म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली.
केंद्रातील भाजपच्या मोदी सरकार मध्ये असलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाकडून शेतकऱ्यांवर वाहन चालवून जीव घेतल्यानंतरही केंद्रीय मंत्री अजय मिश्र याला मोदी सरकारने बरखास्त केले नाही, एवढेच नाही तर कट रचुन भीषण हत्याकांड घडवून आणल्या नंतरही आरोपीला अटक करण्यात आली नाही, न्यायालयाचा ताशेरे ओढल्यानंतर अटक करण्यात येऊन त्याला जामिनावर सोडण्यात आले. हे सर्व मोदी सरकारचे शेतकऱ्यांचा विश्वासघात असून हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे दिसून येते. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलगा आशिष मिश्रा ह्याचे विरोधात पक्के पुरावे असणे, साक्ष असतानाही त्याला जामिनावर सोडणे तसेच अजूनही दोषारोपपत्र दाखल न करणे ही जनते सोबत शुद्ध फसवणूक आहे. ह्याकरता संपुर्ण देशभरात 3 ऑक्टोबर 21 हा शेतकरी हत्याकांडाचा विरोध केला जात आहे. त्याच अनुषंगाने वणी येथे सुद्धा माकप व किसान सभेचा वतीने भव्य निदर्शने करून उपविभागीय अधिकारी ह्यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी कॉ. शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. ऍड. दिलीप परचाके, कॉ. मनोज काळे, गजानन ताकसंडे, प्रकाश घोसले, किसन मोहूरले, कवडू चांदेकर आदी प्रामुख्याने उपस्थित राहून आंदोलनाला यशस्वी केले.