ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

राजनगट्टा येथे वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 10/17/2020 10:51:07 PM

चामोर्शी :- 

भारताचे पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी.जी अब्दुल कलाम यांची जयंती जगभरात जागतिक विद्यार्थी दिन व संपूर्ण महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केल्या जाते. याचेच औचित्य साधत नेहरू युवा केंद्र गडचिरोली अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज युवा मंडळ राजनगट्टा च्या वतीने राजनगट्टा येथे डॉ.ए. पी.जे अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम साजरा करून कलाम-विद्यार्थी आणि पुस्तकांच्या आठवणींना ताजे करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष उमेश भांडेकर ,सचिव अनुप कोहळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सदर उपक्रमात गावातील युवक व विद्यार्थांनी  मोठ्या संख्येनी उपस्थिती नोंदवली त्या बद्दल मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

चामोर्शी प्रतिनिधी
9579683087

Share

Other News