*भगूरमध्ये विद्यार्थी मार्गदर्शन व प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन*
'उद्याचा सक्षम नागरिक घडविण्यासाठी' भगूरपुत्र स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठानचा उपक्रम
भगूर प्रतिनिधी:-
'उद्याचा सक्षम नागरिक घडविण्या'च्या उद्देशाने 'भगूरपुत्र स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठान, भगूर' यांच्या वतीने विशेष 'विद्यार्थी मार्गदर्शन व प्रेरणा कार्यक्रमा'चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता भगूर येथील 'मातोश्री प्रेरणा लॉन्स' (विजयनगर) येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमामध्ये "ध्येयवेध, ध्येय निश्चिती आणि व्यक्तिमत्त्व विकास" या विषयावर कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते म्हणून श्री. संजय विश्वंभर कुलकर्णी (मा. अधीक्षक : केंद्रीय वस्तू व सेवाकर, सीमा शुल्क, पुणे) उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत
या कार्यक्रमाचे आयोजक व पदाधिकारी सर्व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी — श्री. राधाकृष्ण गामने, श्री. प्रताप पवार, श्री. शाम शिंदे, श्री. ज्ञानेश्वर गणोरे, श्री. मुकुंद (नाना) देशमुख आणि सेवानिवृत्त वन परिक्षेत्र अधिकारी श्री. राजन गायकवाड. तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी: कार्याध्यक्ष श्री. एकनाथरावजी शेटे (सर), अध्यक्ष श्री. केशव कासार , सचिव श्री. प्रताप गायकवाड, तसेच सदस्य श्री. संजय आरिंगळे, श्री. ज्ञानेश्वर करंजकर, श्री. दिनेश गोविल, श्री. विजय सुराणा, श्री. कैलास भोर, श्री. रवींद्र देशमुख, श्री. मृत्यूंजय कापसे आणि श्री. विलास देशमुख.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, परिसरातील सर्व विद्यार्थी, तरुण व नागरिकांनी या मार्गदर्शन व प्रेरणा कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक व प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.