लाडक्या बहिणीच्या निधीला गती, मग ‘लाडक्या शेतकऱ्यांचे’ पैसे कधी?

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 25/09/2026 8:03 AM

जामखेड हिंदी मराठी पत्रकार तालुका संघटक रवी कुमार शिंदे

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’च्या ९वा आणि १०वा हप्ता वितरणाची प्रतीक्षा; शेतकऱ्यांचा शासनाला सवाल

अहिल्यानगर : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या ९वा आणि १०वा हप्त्याच्या वितरणाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निधी वितरणासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी झाल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यावर निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकऱ्यांकडूनही आपल्या प्रलंबित हप्त्याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘लाडक्या बहिणीं’च्या निधी वितरणासाठी शासनाकडून निर्णय घेऊन प्रक्रिया सुरू झाली, मग ‘लाडक्या शेतकऱ्यांच्या’ प्रलंबित हप्त्याबाबत निर्णय कधी होणार? असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ९वा आणि १०वा हप्ता अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याने खरीप हंगामाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतीचा खर्च, बियाणे, खते, औषधे आणि इतर निविष्ठांसाठी पैशांची गरज असताना प्रलंबित हप्त्याची रक्कम लवकर मिळावी, अशी मागणी होत आहे.

शासनाने महिला लाभार्थ्यांच्या निधी वितरणासाठी प्रक्रिया सुरू केली आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रलंबित ९वा आणि १०वा हप्त्याबाबतही स्पष्ट निर्णय घेऊन निधी वितरणाची तारीख जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

‘बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली; मग शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रलंबित हप्ते कधी?’ हा प्रश्न सध्या शेतकरी वर्गातून चर्चेत आहे.

#नमोशेतकरीमहासन्माननिधी

#नमोशेतकरीहप्ता

#शेतकरीनिधी

#लाडकीबहीणयोजना

#अहिल्यानगरशेतकरी

Share

Other News

ताज्या बातम्या