कुपवाडमध्ये संघर्ष समितीने केला 'खाकी ' चा सन्मान, एक सन्मान मानाचा आणि जनरक्षकांचा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/09/2026 4:21 PM

*एक सन्मान मानाचा..आणि जनरक्षकांचा..* काल गणेशविसर्जनाचा नववा दिवस संपूर्ण कुपवाड शहर भक्तीमय वातावरणात,संगीताच्या आणि ढोलताशाच्या गजरात कुपवाडच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणुका निघाल्या होत्या दरवर्षीप्रमाणे गणरायाला निरोप देण्यासाठी समितीच्यावतीने भव्य अशी स्वागत कमान व स्वागतमंच उभारण्यात आले होते. गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी संघर्ष समिती नेहमीच प्रयत्नशील असते पण,त्यास सुरक्षेची साथही तितकीच महत्वाची असते ती साथ म्हणजे कुपवाड एम.आय.डि.सी.पोलीसठाणे. प्रत्येक वेळी आमच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरणारे पोलिस निरीक्षक व त्यांची सर्व कर्मचारी वर्ग. संपूर्ण कुपवाड शहर व परिसराला सुरक्षा पुरवून सणवार शांतपणे पार पाडणाऱ्यांचा सत्कार करणे आमचं कर्तव्य समजून *सर्वश्री सपोनि आनंदराव घाडगेसाहेब* ..संजय संदी..वहातुक शाखेचे सरगर..व संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सन्मान संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला..

Share

Other News

ताज्या बातम्या