कुपवाड : प्रतिनिधी
कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स, एम.एस.आय. ब्लड बँक (मिरज), आधार प्रोजेक्ट वेलफेअर सोसायटी (सांगली) आणि संपूर्ण सुरक्षा केंद्र (मिरज) यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व नेत्रतपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला असून एकूण १४० नागरिकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी ७९ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिराचे आयोजन कृष्णा व्हॅली चेंबरचे व्यवस्थापक अमोल पाटील, मदन काटकर, एम.एस.आय. ब्लड बँकेचे प्रभात नाईक तसेच आधार प्रोजेक्ट वेलफेअर सोसायटीचे संस्थापक सुरेश संकपाळ यांनी केले.
मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व नेत्रतपासणी डॉ. संजय भिलावे व डॉ. अरुणा कांबळे यांनी केली. तसेच रक्तदान शिबिराचे नियोजन व रक्तसंकलन एम.एस.आय. ब्लड बँकेचे डॉ. किरण बरगाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या उपक्रमात कलापी इंजिनिअरिंग प्रा. लि., उमेद ग्रुप, साई इंडस्ट्रीज, युनिटी पी.एफ., मेनन पिस्टन, चिंचवाडे असोसिएट, विजेता स्विचगिअर, योगी कॉर्पोरेशन, गॅलक्सी ट्रान्समिशन, बास्को इंजिनिअरिंग प्रा. लि., डेक्कन ट्रेडर्स, शाह प्रेसिकास्ट, प्रोकेअर क्रॉप सायन्स, पार्थ इंडस्ट्रीज, भारत इंडस्ट्रीज आणि विद्यासागर इंडस्ट्रीज येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आधार प्रोजेक्ट वेलफेअर सोसायटीच्या प्रतीक्षा कदम, माधुरी नवाळे, अमित भोसले तसेच एम.एस.आय. ब्लड बँकेचे संतोष नांगरे, शाहरुख बेग, श्रुती पाटील, गायत्री शिरसाठ, राजेश घाडगे आणि माया कोकरे, मुस्कान शेख अष्टक यांनी विशेष परिश्रम घेतले.
सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, रक्तदानासह आरोग्य जनजागृतीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.