पोलीस स्टेशन इस्लापूर यांनी अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करुन 1,34,882/- रु किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 04/07/2026 2:13 PM

नांदेड :- मा.डॉ.नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दिनांक 03/07/2026 रोजी पोलीस स्टेशन इस्लापूरच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हुंडी ते तोटंबा मार्गावरील नाल्याजवळ सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी एका Royal Enfield मोटारसायकल (MH-26-DB-1374) वरून प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूची वाहतूक करून विक्रीसाठी नेत असल्याचे आढळून आले.

कारवाई दरम्यान आरोपीच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू असा ₹54,882/- किमतीचा मुद्देमाल तसेच Royal Enfield मोटारसायकल किंमत ₹80,000/- असा एकूण ₹1,34,882/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी आरोपी नामे दिपक गणेश आलडवाड, वय 30, रा. किनवट याचे विरुद्ध पो. स्टे. इस्लापुर गु.र.नं. 84/2026 कलम 123, 274, 275 भारतीय न्याय संहिता (BNS) सह कलम 26, 27, 30(2) (अ) अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अन्वये पोलीस स्टेशन इस्लापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई मा. श्री. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड, सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. जाधवर, यांच्या मार्गदर्शनाखाली मपोउपनि / कागणे व पोकों/ नागरगोजे, साखरे सर्व नेमणुक इस्लापुर पोलीस स्टेशन यांनी केली आहे.

नांदेड जिल्हा पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला अथवा पोलीस नियंत्रण कक्षास कळवावी. अशा बेकायदेशीर व्यवसायाविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या