वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी वाई पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला; कायदा-सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार!

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 06/07/2026 1:18 PM

  वाई /प्रतिनिधी. 

सातारा जिल्हा पोलीस दलात पोलिस अधिकाऱ्यांच्या पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशात अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यामध्ये वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांची सांगलीला बदली झाल्याने वाई पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पद हे रिक्त होते. त्यांच्या जागेवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली असून. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी वाई पोलीस ठाण्याचा बुधवारी सकाळी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी हे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांना पोलीस खात्यात ओळखले जाते. त्यांनी आजपर्यंत कोल्हापूर परिक्षेत्रातील विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या नव्या एन्ट्रीमुळे वाई पोलीस ठाण्याला खमक्या अधिकारी मिळाल्याचे वाईनगरीतून बोलले जात आहे. मात्र वाई शहरांत आणि ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्था, तसेच गुन्हेगारीला आळा घालणे, हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या