स्वातंत्र्य वीर सावरकर भूमीतील सत्कार प्रेरणादाई. उत्तमराव जाधव.
स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात समिधा अर्पण करून भारत भूमीला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या पावन भूमीत माझा सत्कार झाला, हे माझे परम भाग्य असून हा सत्कार माझ्या काळजात जपून ठेवील असे प्रतिपादन भडगाव जळगाव येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव यांनी केले. भगूर येथील स्वातंत्र्य वीर सावरकर जयंती उत्सव समितीचे आधारस्तंभ उत्तमराव जाधव यांची भडगाव येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती झाली त्याबद्दल समितीच्या वतीने आनंदवन मिसळ येथे त्यांचा सत्कार आयोजित केला होता त्या प्रसंगी ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे संस्थापक सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक रमेश पवार हे होते, कार्यक्रम प्रसंगी शिवसेना नेते जयंत भाऊ गाडेकर, रमेश पवार यांची भाषणे झाली. प्रास्ताविक प्रशांत कापसे यांनी केले. कार्यक्रमास सेवानिवृत पोलिस उपायुक्त शामराव शिंदे, सेवानिवृत्त वनाधिकारी राजेंद्र कापसे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तानाजी आबा करंजकर, नगरसेवक दीपक बलकवडे, अविनाश कातकाडे राजाभाऊ सोनवणे, पत्रकार भारत चव्हाण दीपक कणसे, माजी मुख्याध्यापक वसंतराव खैरनार, कमलाकर देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.