महोत्सव २०२५ : विविध क्रीडा प्रकारांचे विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न;सर्वसाधारण विजेतेपद – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे; उपविजेता – मुंबई विद्यापीठ मुंबई;तृतीय क्रमांक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर
नांदेड:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५ मधील विविध क्रीडा प्रकारांचे चार दिवस चाललेल्या या महोत्सवात राज्यातील विविध विद्यापीठांच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून पारितोषिक प्राप्त केले. सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे; उपविजेता मुंबई विद्यापीठ मुंबई आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाच्या संघास मिळाले आहे.
बक्षीस वितरण समारंभास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. समारंभास विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. संगीता माकोने, डॉ. सुर्यकांत जोगदंड, नारायण चौधरी, डॉ. सुरेखा भोसले, यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
ॲथलेटिक्स प्रकारात मुलांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर उपविजेता ठरले तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तृतीय स्थानावर राहिले. मुलींमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळवला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ द्वितीय आणि मुंबई विद्यापीठ तृतीय स्थानी राहिले.
बुद्धिबळ प्रकारात मुलांच्या गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विजेतेपद मिळवले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर उपविजेता ठरले तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने तृतीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर प्रथम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वितीय आणि मुंबई विद्यापीठ तृतीय क्रमांकावर राहिले.
बॅडमिंटन स्पर्धेत मुलांमध्ये मुंबई विद्यापीठ प्रथम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ द्वितीय तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तृतीय झाले. मुलींमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विजेतेपद मिळवले. नागपूर विद्यापीठ उपविजेता आणि मुंबई विद्यापीठ तृतीय स्थानी राहिले.
खो-खो प्रकारात मुलांमध्ये यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपविजेता ठरले तर मुंबई विद्यापीठ तृतीय स्थानावर राहिले. मुलींच्या गटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रथम, मुंबई विद्यापीठ द्वितीय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तृतीय स्थानी राहिले.
बास्केटबॉल प्रकारात मुलांमध्ये मुंबई विद्यापीठाने विजेतेपद पटकावले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वितीय आणि नागपूर विद्यापीठ तृतीय स्थानी राहिले. मुलींमध्ये नागपूर विद्यापीठ प्रथम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वितीय आणि मुंबई विद्यापीठ तृतीय स्थानी राहिले.
टेबल टेनिस प्रकारात मुलांमध्ये नागपूर विद्यापीठ प्रथम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वितीय आणि यजमान विद्यापीठ नांदेड तृतीय स्थानी राहिले. मुलींच्या गटात मुंबई विद्यापीठ प्रथम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वितीय आणि एसएनडीटी महिला विद्यापीठ तृतीय क्रमांकावर राहिले.
व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रथम, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा द्वितीय आणि नागपूर विद्यापीठ तृतीय ठरले. मुलींच्या गटात एसएनडीटी विद्यापीठाने विजेतेपद मिळवले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वितीय आणि मुंबई विद्यापीठ तृतीय स्थानी राहिले.
कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रथम, मुंबई विद्यापीठाने द्वितीय तर शिवाजी विद्यापीठाने तृतीय स्थान पटकावले. मुलींच्या गटात मुंबई विद्यापीठाने विजेतेपद मिळवले. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ द्वितीय आणि वारणा विद्यापीठ तृतीय स्थानी राहिले.
यावेळी मा.राज्यपाल समितीतील डॉ. अरुण माने, डॉ. गोविंद कतलाकुटे, कविता खोलगडे, दिनेश पाटील, सचिन देशमुख, डॉ. मनोज रेड्डी, शरद बनसोडे, राजू बोरकर, तसेच भारत पोर्टलचे युनुस शेख, विविध क्रीडा प्रकारांचे समन्वयक माधव शेजूळ, अंकुश पाटील, संघर्ष शृंगारे, डॉ. कल्लेपवार, डॉ. प्रदीप देशमुख, डॉ. नवनाथ लोखंडे, नागनाथ गजमल, डॉ. मनोज पैजणे, डॉ. भास्कर रेड्डी, डॉ. महेश वाखरडकर, अश्विन बोरीकर, डॉ. दिनेश हंबर्डे, डॉ. विक्रांत कुंटूरवार आदींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. निकाल समितीतून मनोज वर्मा, इब्राहिम शुक्ला, सचिन चामले, सुदाम शेळके, आदी मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.
स्वागताध्यक्ष अशोक महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. आणि आभार प्रदर्शन क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने यांनी केले. राज्यगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.