सांगली जिल्हयातील सध्यपरिस्थिती भयानक, नागरिक मोठ्या प्रमाणात अस्वस्थ... ठोस पावले उचलण्याची गरज

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/12/2025 11:32 AM

सांगली जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थिती बाबत सर्व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात अस्वस्थ आहेत. वाढती गुन्हेगारी नशेखोरांचे वाढते प्रमाण वाढती असुरक्षितता चिंतेचा विषय आहे.
भय मुक्त ,नशा मुक्त अभियान चालू करून आज दहावा दिवस आहे. फॉर्म भरून घेताना एकेक नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर काय भयानक परिस्थिती आहे याची जाणीव कोणाला आहे किंवा नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.
पालकमंत्री मा नाम चंद्रकांत दादा पाटील,माजी मंत्री जयंत पाटील साहेब,खासदार विशाल दादा पाटील,आमदार सुरेश भाऊ खाडे,आमदार सुधीर दादा गाडगीळ, माजी मंत्री विश्वजीत कदम, आमदार सुहास बाबर,आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रोहित पाटील,आमदार आमदार सत्यजीत देशमुख,आमदार अरुण अण्णा लाड,आमदार इद्रिस भाई नायकवडी यांना विनंती आहे ठोस पावले याबाबत उचलण्यात यावीत अन्यथा विनाश अटळ आहे 
लोकसभेत असेल विधानसभेत असेल याबाबत वेगवेगळ्या आमदार प्रश्न मानतात मात्र त्यावर उपाययोजना किंवा कार्यवाही होताना दिसत नाही 

सतीश साखळकर तानाजी सावंत कुलदीप देवकुळे शंभूराज काटकर सुरेश टेंगले रविंद वळवडे युसुफ उर्फ लालू मिस्त्री 

भय व नशा मुक्त अभियान समिती सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या