ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

रबी मका हंगाम २०१९-२० खरेदीचा पेमेंट अजूनही दिला नाही.

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 9/15/2020 10:07:20 PM

पेंढरी :- 

आधारभूत खरेदी योजना हंगाम सण २०१९ ते २०२० या कालावधीमध्ये मका खरेदी करण्यात आले  खरेदी केंद्र धानोरा अंतर्गत समाज मंदिर पायडी, झाडापापडा येथे दि.२५ -७-२०२० ते दि. ३०-७-२०२० पर्यंत खरेदी करण्यात आले मका खरेदी करिता उपप्रादेशिक कार्यालय धानोरा येथील प्रतिनिधी व तहसील कार्यालय धानोरा अंतर्गत येथील तलाठी खरेदी करून आपल्या ताब्यात घेतले.

परंतु आजच्या तारखेपर्यंत कास्तकाराच्या विकलेले मका पेमेंट झालेला नाही. ऑनलाईन करण्याची जबाबदारी व कुंड्या काढण्याची जबाबदारी उपप्रादेशिक कार्यालय धानोरा येथील कर्मचारी शिंम्पी यांच्याकडे दिलेली होती परंतु  मक्याचे पेमेंट जमा झालेले नाही. तरी उपप्रादेशिक कार्यालय धानोरा येथील कर्मचार्‍यांना लवकरात लवकर पेमेंट करण्याची कास्तकाराची विनंती.
 
विनंतीकारक कास्तकार :- जयवंत लकडा, आनंदाबाई गावडे, गांडो आतला,मतरू गांडू समरथ, मंगेश सोमा आतला,महताब मंगल कुदराम.

संतोष मंडल (पेंढरी प्रतिनिधी)
9421735928

Share

Other News