भुसावळ
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा भारती भुसावळ, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ. यांचे अनमोल सहकार्याने रथ सप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधत डी.एस.हायस्कूलचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आज सकाळी शहरातील विविध विद्यालयाचे हजारो विद्यार्थ्यांनी सामुहिक सूर्यनमस्कार उपक्रमात सहभाग घेतला प्रथम मान्यवरांचे असते बजरंग बली व संत रोहिदास जयंती निमित्त संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस म मल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब ऑफ रेल सिटी चे अध्यक्ष विशाल शाहा ,हिंदू सभा न्यास वसंत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सोनू मांडे, साई जीवन चे प्रमुख पिंटू भाऊ कोठारी, अष्टभुजा रेस्टॉरंट व डेरीचे संचालक नितीन धांडे, रोटेरियन सुरेश न्याती सुमित साळुंखे,क्रीडा भारतीचे बी.एन. पाटील, विवेक महाजनी, राजेंद्र कुलकर्णी,महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे , मुख्याध्यापक आर .आर. धनगर, माध्यमिक पतपेढीचे संचालक हेमंत चौधरी, यांच्यासह शहरातील सर्व क्रीडा शिक्षक, शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. महाराणा प्रताप विद्यालयाच्या यांच्या चमूने सूर्यनमस्कारचे प्रात्यक्षिक सादर केले ,उपस्थित महाराणा प्रताप विद्यालय , ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ, के. नारखेड विद्यालय, संत गाडगेबाबा हिंदी विद्यालय, आर जे झांबरे विद्यालय, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, श्री गाडगे बाबा विद्यालय, डी.एस.विद्यालय, म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ, एस. आर.आंबेडकर विद्यालय, डि.एल हिंदी विद्यालय,अशा विविध शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चारात सामूहिक सूर्यनस्कार घातले सूत्रसंचलन राजेंद्र कुलकर्णी यांनी तर प्रास्ताविक डॉ. प्रदीप साखरे यांनी केले, आभार प्रदर्शन वंदना ठोके यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे व बी.डी.धाडी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक सर्व क्रीडा शिक्षक, यांचेसह उपस्थित शिक्षक बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी रोटरी रेल सिटी क्लब ऑफ भुसावळ, साई जीवन सुपर शॉपी भुसावळ, हिंदू सभा संन्यास भुसावळ, यांचे प्रायोजकत्व लाभले.