निवासी तथा सध्या अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदभार असलेले दादासाहेब कांबळेसो आणि सहाय्यक आयुक्त व मालमत्ता कर संकलक म्हणून प्रभारी काम पाहत असलेले आकाश डोईफोडेसो यासोबत घरपट्टी अधिकारी सय्यद या सर्वांसोबत अप्पर जिल्हाधिकारी यांचे दालनात मिटिंग घेतली. जवळपास अडीच ते तीन तास प्रदीर्घ चर्चा केली आणि त्यांचे अहवालाबाबतीत मुद्दे समजून घेतले,खूप साऱ्या त्रुटी यात आहेत ज्या त्यांना अवगत केल्यात. सध्या घरपट्टी अंमलबजावणी यांच्या अहवाला नुसार पण करता येणे नागरी हिताचे नाही असेच चर्चेअंती दिसतेय
चुकीची मालक नोंद,उपयोगकर्ता शुल्क, ड्रेनेज कर,भाडेकरू कर, क्षेत्रफळ वाढ ,चुकलेलं जुने कर धोरण, अंमलबजावणी मधील त्रुटी आणि अनुषंगाने आवश्यक पार्किंग, प्राण्यांचे पिंजरे, शेड, जनावर गोठे, इमारत प्रकार, इमारतीचे वय,इमारतीचे क्षेत्रफळ, इमारत वापर, ओपन प्लॉट, गुंठेवारी मधील करआकारणी , विनापरवाना बांधकामास दुप्पट आकारणी,जागेच्या क्षेत्रफळ अनुषंगाने स्लॅब्स अशा आणि इतर बऱ्याच गोष्टीबाबत मी बोललो आहे. मी या चर्चेत अगदी सविस्तर मुद्देसूद, कायदेशीर धोरण अनुषंगाने आवश्यक बदल सगळेच मांडलेय.
पण घरपट्टी लढाई लढताना कागदावर हारायला नको म्हणून यांच्यावर आणि यांच्या अहवालावर लक्ष ठेऊनच राहील, सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील कारण लढाई रस्त्यावर आणि कागदावर दोन्हीकडे लढायची आहे.
पण सरते शेवटी आमचं एकच म्हणणं आहे. .
निवडून आलेल्या प्रतिनिधीना धोरण ठरवू देत तुम्ही का घाई करताय?
घरपट्टी अंमलबजावणी सध्या नकोच.
मा. नगरसेवक,
अभिजीत भोसले