फुड फेस्टिवल मधून विद्यार्थ्यांना स्वयंमरोजगाराच्या संधी
मविप्रचे चिटणीस दिलीप दळवी यांचे प्रतिपादन
देवळाली कॅम्प, प्रतिनिधी
महाविद्यालयात राबविण्यात येणा-या फुड फेस्टिवलच्या आयोजनात सातत्य हवे. या उपक्रमाकडे विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीने पहायला हवे. जिल्हयातील सर्वच महाविद्यालयांनी अश्या स्वरुपाच्या उपक्रमाचे अनुकरण करायला हवे, यामधून विद्यार्थ्यांना स्वयंम रोजगाराच्या संधी प्राप्त होऊ शकतात. असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे चिटणीस दिलीप दळवी यांनी केले.
येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात फुड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मविप्र चिटणीस दिलीप दळवी बोलत होते. याप्रसंगी मविप्र संस्थेचे नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश आबा पिंगळे, शालेय समितीचे अध्यक्ष विलास धर्जड, ज्येष्ट सभासद बळवंत गोडसे,प्राचार्या प्रतिमा वाघ, आदी मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या पदवी व पदव्युत्तर वर्गातील शंभर विद्यार्थ्यांनी पस्तीस फुड स्टॉल उभारले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी नवनवीन पस्तीस पदार्थ तयार करुन ना नफा ना तोटा या तत्वावर विक्री केले. प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ यांनी विद्यार्थ्यांनी पदार्थ करतांना त्याचा दर्जा टिकवायला हवा. पदार्थाच्या दर्जावर विक्री अवलंबून असल्याचे त्यांनी म्हटले. कार्यक्रमाचे संयोजनासाठी सुनिल सौंदाणकर, डॉ. मनिषा गिरासे, प्रेरणा रायते, ऐश्वर्या एखंडे, अश्विनी कडभाने, पुनम बोरसे, ऋतुजा अहिरे, विनेश कवटे, महेश पाबळे यांनी परिश्रम घेतले.